शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचारी आक्रमक

By admin | Updated: August 13, 2015 23:33 IST

महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी व अधिकारी महासंघ आक्रमक झाला आहे. १३ मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे

नवी मुंबई : महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी व अधिकारी महासंघ आक्रमक झाला आहे. १३ मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी २० आॅगस्टला पालिका मुख्यालयामध्ये बैठक होणार आहे. पालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सरकारी निर्णयाप्रमाणे महासभेच्या मान्यतेनुसार वैद्यकीय खर्चाच्या देयक देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कल्याण निधीविषयी त्वरित निर्णय घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावे, लिपिक, टंकलेखक, माहिती नोंदणीकार, वरिष्ठ लिपिक, करनिरीक्षक व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती तत्काळ करण्यात यावी. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीमधील अनुशेष त्वरित भरण्यात यावा. १२ ते १४ वर्षे कार्यरत असलेल्या परंतु अद्यापपर्यंत पदोन्नतीची संधी उपलब्ध न झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. एकाच विभागाकडे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या सर्वच संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात अशा मागण्या आहेत.महापालिका कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, वाहन कर्ज, सण अग्रिमाच्या मर्यादा वाढविणे, सदनिका नूतनीकरण, दुरुस्ती यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत अग्रीम मंजूर करण्यात यावे. मुख्यालयात प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात यावी. पालिकेच्या उपाहारगृहामध्ये सवलतीच्या दरात भोजन व इतर खाद्यपदार्थ मिळावेत, अशा मागण्या नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी महासंघाने केल्या आहेत. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २० आॅगस्टला पालिका मुख्यालयामध्ये सर्व कामगारांच्या बैठकीचे आयोजन केल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी दिली आहे.