Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 16, 2025 17:07 IST2025-06-16T17:06:48+5:302025-06-16T17:07:37+5:30

Vashi Wall Collapse: घटनास्थळी वाशी अग्निशमनदल दाखल झाले आहे. त्यांच्याकडून नाल्यात गेलेली वाहने बाहेर काढण्याचे व कोसळलेली झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. 

Drainage wall collapses at Vashi Plaza; 9 two-wheelers, tempo damaged | Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान

Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क, 

नवी मुंबई: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचून ९ दुचाकी व १ टेम्पोचे नुकसान झाले आहे. नाल्याला भक्कम सुरक्षा भिंत नसल्याने नाल्याशेजारची माती खचून ही दुर्घटना घडली. 

घटनास्थळी वाशी अग्निशमनदल दाखल झाले आहे. त्यांच्याकडून नाल्यात गेलेली वाहने बाहेर काढण्याचे व कोसळलेली झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. 

नवी मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. जोरदार पावसाने नवी मुंबईतील रस्ते पाण्याने भरले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने नाले सफाई केली नसल्याचे समोर येत असून नागरिकांना, वाहन चालकांना प्रवास करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळला आहे. या अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली आहे. हा पूल कोसळल्याने ५०० पेक्षा अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. कॅम्प नंबर पाचच्या गणेश नगर भागात नाल्यावर असलेल्या या पूलाची दुरावस्था झाली होती. 
 

Web Title: Drainage wall collapses at Vashi Plaza; 9 two-wheelers, tempo damaged