शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६७० जणांना सर्प तर २४१२ जणांना विंचू दंश

By admin | Updated: December 12, 2015 00:55 IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला,

सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला, तर २४१२ जणाना विंचू चावल्याची घटना घडल्या आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधील या घटना झाल्या. यात सुदैवाने एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनवणे यांनी केला. गेल्या वर्षी देखील मृत्यू झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र लोकमतने सर्व्हे केला असता शहापूरच्या बाबरवाडीत दोन भावंडे, भिवंडीच्या खोणीतील दोन भाऊ आणि खंबाळे येथील एकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या वर्षी देखील एकही मृत्यू नसल्याचा दावा केला आहे. या सर्प दंशाच्या सर्वाधिक घटना जून, जुलै, आॅगस्ट या कालावधीत घडल्या आहेत. पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे, निवासी क्षेत्र, पायवाटा, वर्दळीचे ठिकाणे, गवत, शेतातील पीकालगतचे तण, दगडाच्या आडोशाला असलेले सर्प व विंचू चावले. अशा रूग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळीच उपचार झाले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकही मृत्यू जिल्ह्यात झाला नसल्याचे प्रतिपादन डॉ. सोनवणे यांनी केले. गेल्या वर्षाच्या मे, जून, जुलै या तीन महिन्यात ठाणे, पालघर या दोन्ही जिह्यात सुमारे एक हजार १२ जणांना सर्प दंश झाला आहे. पण मागील आठ महिन्यात केवळ ठाणे जिल्ह्यातील ६७० जणांना सर्प दंश झाला. यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यातील २८७ जणांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील १९७ जण आहेत, मुरबाडमधील ८४, अंबरनाथचे ७४ आणि कल्याणच्या २८ जणांना सर्प दंश झाला आहे. विंचू चावलेल्या दोन हजार ४१२ रूग्णांवर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार झाले. मागील दोन हजार १४५ विंचू दंशाचे रूग्ण होते. त्यात या वर्षी २६७ रूग्णांची वाढ होऊन विंचू दंशाचे दोन हजार ४१२ जण आढळले आहेत.