शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा

By admin | Updated: August 30, 2015 23:50 IST

नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे

पनवेल : नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा करण्यात आली.शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे, शहरात एनएमएमटी बससेवा सुरु करणे, राष्ट्रपुरुषांच्या नावाने महत्त्वाच्या रस्त्यांना नावे देणे आदी महत्त्वाच्या विषयांवर शुक्रवारी झालेल्या सभेत चर्चा करण्यात आली.नगरपरिषदेवर काही दिवसांपूर्वी कफ सह एकूण ५० संस्थांनी मोर्चा काढत नगरपरिषदेच्या कामकाजाचा निषेध केला होता . याचे पडसाद याठिकाणी उमटल्याचे पहावयास मिळाले. शहरात नगरपरिषदेची परिवहन सेवा सुरु करण्यात येईल असे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप ही सेवा सुरु झाली नाही. शहरातील नागरिकांना परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कफ या संस्थेने शहरात नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कंपनीस परिषदेमार्फत नाहरकत दाखला देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करीत नगरपरिषद काही अटीवर नवी मुंबई महापालिका परिवहनची बस सेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजते. मात्र या वेळी विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी बससेवा सुरु करायची असेल तर त्यांच्यावर अटी किंवा बंधने घालू नयेत अशी सूचना केली आहे. सध्या पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याचा विषय गाजत असताना नगरपरिषदेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत खारघर, कळंबोली आदी शहरातील नागरिकांनी पनवेल महानगरपालिके मध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला आहे. अशा वेळी पनवेल नगरपरिषद जवळच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची मदत घेण्याचा विचार करत असेल तर पनवेल नगरपरिषदेच्या दृष्टीने नकारात्मक वातावरण करणारे आहे. पीएमटी या बससेवेची घोषणा करुन ती रस्त्यांवर कधी धावणार असा प्रश्न सध्या पनवेलकरांना पडला आहे. शहरातील रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. पनवेल नगरपरिषद शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगरपरिषदेमार्फत कचरा वेचक यांचा सर्व्हे करुन नोंद घेणे त्याकरिता खाजगी संस्थेची नियुक्ती करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळांचे बांधकाम निष्काशित व नियमित करणे आदींवर चर्चा झाली. याअंतर्गत शहरातील सात मंदिरे नियमित करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. कचऱ्याच्या प्रश्नावरुन नगरसेवक लतीफ शेख यांनी नगरपरिषदेचे वाभाडे काढले. एकही योजना यशस्वी होत नाही केवळ कागदोपत्री चर्चा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरपरिषद हद्दीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला मंजुरी दिली. शहरातील अनधिकृत हातगाड्या चालवणाऱ्यांकडून काही जण हप्ते वसुली करत असल्याचा आरोप नगरसेविका निर्मला म्हात्रे यांनी केला. (प्रतिनिधी)