शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी रेडिमेड किल्ल्यांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2015 23:17 IST

शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीत किल्ल्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. रायगड किल्ल्यावरुन अटकेपार झेंजे फडकविणारे मराठे,

पेण : शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीत किल्ल्यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. रायगड किल्ल्यावरुन अटकेपार झेंजे फडकविणारे मराठे, छत्रपतीने उभा केलेला हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास व त्याचे साक्षीदार असलेले स्वराज्याचे वैभव म्हणजे गडकोट किल्ले. लहान मुलांना मातीपासून किल्ले बनविण्याची छंद असतो. दिवाळीत हे किल्ले बनविले जातात, मात्र सध्या रेडिमेड किल्ल्यांना मागणी वाढली असल्याने प्लॅस्टर आॅफ पॅरिस पासून किल्ले बनविण्याचे काम पेणमधील कलाकारांनी सुरू केले आहे.पेणच्या दिपक कला केंद्राने तब्बल २००० ते २५०० पीओपीेचे रेडीमेड किल्ले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी होलसेल व रिटेल या स्वरुपात तयार केल्याची माहिती कार्यशाळेचे निलेश समेळ यांनी दिली आहे. १०० रुपयांपासून १,५०० रुपयापर्यंत एक फूट उंचीपासून तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले कार्यशाळेत तयार असून गतवर्षीपेक्षा एक हजार किल्ल्यांची मागणी या वर्षी वाढली आहे. आठ प्रकारातील हे किल्ले पीओपीचे असल्याने वजनाने हलके आहेत. त्यांची सहज ने - आण करता येते. शहरात या किल्ल्यांना मोठी मागणी आहे. (वार्ताहर)