शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी

By admin | Updated: September 25, 2015 02:28 IST

शहराच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे

नवी मुंबई : शहराच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सिडकोने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. साडेचारशे वर्षांची पार्श्वभूमी असणाऱ्या किल्ल्याची डागडुजी व सुशोभीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. नवी मुंबई शहर सिडकोने वसविले असले तरी ठाणे - बेलापूरच्या या पट्ट्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. घणसोली गावात अनेक वर्षे स्वातंत्र्यसैनिकांची छावणी होती. अनेक भूमिपुत्रांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. बेलापूर किल्ल्यालाही तब्बल साडेचारशे वर्षांची पार्श्वभूमी आहे. महापालिका मुख्यालयाच्या समोर असणाऱ्या किल्ल्याची देखभालीअभावी प्रचंड दुरवस्था झाली आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना पत्र पाठविले आहे. विधान परिषद सदस्य असताना शासन स्तरावर पाठपुरावा केला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. आमदार अरविंद सावंत, मधू चव्हाण, विवेकानंद पाटील, तत्कालीन पालिका आयुक्त विजय नाहटा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील यांनी किल्ल्याची पाहणी केली होती. सिडको गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये किल्ल्याचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च होणार होते. या कामाचे नियोजन करण्यासाठी पुण्यामधील एका संस्थेची नियुक्तीही केली होती. परंतु पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही. पुरातत्व विभागाकडून मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. सिडकोेने किल्ला संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत. नवी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना येथील इतिहास समजला पाहिजे. यामुळे शक्य तितक्या लवकर किल्ला संवर्धनासाठीची पावले उचलावी, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडे केली आहे.