शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या मेळाव्याला दादांची दांडी, मात्र तटकरेंनी सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 02:52 IST

ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर झाले होते.

ठाणे : ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर झाले होते. परंतु, प्रत्यक्षात या मेळाव्याकडे दादा फिरकलेच नाही. अर्थात, तटकरे आले. त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकसंधपणे मतभेद विसरून लोकांपर्यंत जा, त्यांची कामे करा, असा सल्ला दिला. तसेच ठाणे महापालिकेवर राज्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला. या वर्षी होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आणि २०१७ मध्ये होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा. पैशांऐवजी विचारांची संपत्ती पाहून कार्यकर्त्यांना पदे बहाल करा, असा सल्ला त्यांनी ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि प्रदेश युवक अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांना दिला. राष्ट्रवादीला अपयश आल्याचे दु:ख नाही. राजकारणात जयपराजय होत असतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत जी आश्वासने दिली गेलीत, ती पूर्ण न झाल्यामुळे जनतेत प्रक्षोभ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून त्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. सत्ता मिळण्यापूर्वी विरोधी पक्षात असतांना दुष्काळी भागाचा दौरा करणाऱ्या शिवसेनेचा एकही पालकमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबरच्या दौऱ्यात सहभागी झालेला नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला. सर्व कार्यकर्त्यांनी ठरविले तर आगामी काळात ठामपावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका जवळ आल्यावर हजारो कोटींची कामे केली जातात, याकडेही बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईत शिवसेना-भाजपची युती होती, तर काँग्रेसनेही साथ सोडली, तरीही तिथे एकहाती सत्ता जिंकणाऱ्या गणेश नाईकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. माजी उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे, सिडकोचे माजी संचालक प्रमोद हिंदुराव, ठाण्याचे माजी महापौर मोहन गुप्ते, अशोक राऊळ, नईम खान, मोहन साळवी, टीडीसीचे अध्यक्ष बाबाजी पाटील, संचालक अशोक पोहेकर आदी उपस्थित होते.