शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची फसवणूक

By admin | Updated: November 2, 2015 02:18 IST

गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात रिअल इस्टेटमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, हजारोंचे आर्थिक नुकसान झाले आहे

पनवेल : गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात रिअल इस्टेटमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, हजारोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिल्डरांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. गृहनिर्माण प्रकल्प उभारताना बिनशेती परवानगी आवश्यक आहे. ती मिळेपर्यंत नियमानुसार बांधकाम करता येत नाही किंवा बुकिंगसुद्धा घेणे नियमबाह्य आहे. त्याचबरोबर जितकी घरे तितकेच बुकिंग न घेता दुप्पट- तिप्पट बुकिंग घेऊन पनवेलमध्ये या बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यवधींची माया जमवली. नैना प्रकल्पांतर्गत या परिसराचा विकास करण्यात येत असल्याने सिडकोने अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत. त्याचबरोबर बेकायदा अनेक बिल्डिंग जमीनदोस्त केल्या. बिल्डरने पैसे घेतले मात्र घरेच दिले नाहीत, अशा अनेक तक्रारीही खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत जवळपास आठ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एकदा क गुन्हा दाखल झाला की मग त्या बिल्डरला जाब विचारता येत नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करू नका, मात्र आमचे पैसे परत मिळवून द्या, अशी मागणी ग्राहकांकडून पोलिसांकडे करण्यात येत आहे. वास्तविक पाहता ग्राहकांनी सगळ्या बाबी पडताळूनच पैसे देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांशी लोक अल्प उत्पादन गटातील असल्याने त्यांना फारसा दोष देता येत नाही. बांधकाम व्यावसायिकांच्या कागदपत्रांची तपासणी, त्याचबरोबर इतर गोष्टी पाहण्याचा अधिकार आम्हाला नाही. फसवणूक करणाऱ्यांविरोधात आम्ही गुन्हा दाखल करतो.-विश्वास पांढरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -2