शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण प्रकरणी नगरसेवकाला कोठडी

By admin | Updated: October 31, 2015 00:17 IST

युवा सेनेचा पदाधिकारी मकरंद म्हात्रे याच्यावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक व साथीदाराला ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी इतर फरार व्यक्तींचा नेरूळ पोलीस शोध घेत आहेत.

नवी मुंबई : युवा सेनेचा पदाधिकारी मकरंद म्हात्रे याच्यावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक व साथीदाराला ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी इतर फरार व्यक्तींचा नेरूळ पोलीस शोध घेत आहेत.गुरुवारी दुपारी कुकशेत येथे झालेल्या मारहाण प्रकरणी नेरूळ पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा युवक जिल्हा अध्यक्ष सूरज पाटील व सहकारी विशाल पाटील यांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. गुरुवारी दुपारी मकरंद म्हात्रे याला कुकशेत येथे एकट्याला अडवून ७ ते ८ जणांनी मारहाण केली आहे. यामध्ये मकरंद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यात यापूर्वी देखील वाद झाले होते. कुकशेतमधील काही मंदिरांवर सिडको व पालिकेची संयुक्त कारवाई झाली होती. यामध्ये मकरंद याचेही घराच्या आवारातील मंदिर पाडण्यात आलेले. या कारवाईला त्याने नगरसेवकाला दोषी धरून निषेधाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. यावरून घटनेच्या एक दिवस अगोदर बुधवारी सूरज पाटील व त्याच्यात वाद झाला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला पाटील यांचे कार्यकर्ते व भावांनी जबर मारहाण केली. त्यानुसार दोघांना अटक केली असून इतर फरार असलेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे कुकशेत परिसरात अद्यापही राजकीय वातावरण तणावाचे आहे. (प्रतिनिधी)