Coronavirus : थुंकणाऱ्यांवर कारवाईची गरज, पान टप-या सुरूच  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 04:18 AM2020-03-20T04:18:44+5:302020-03-20T04:19:07+5:30

पानटपऱ्यांवरील मसालाजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर सर्रास थुंकण्याचा प्रकार अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याबाबत कडक कारवाईची गरज आहे.

Coronavirus : The need for action on the spitters | Coronavirus : थुंकणाऱ्यांवर कारवाईची गरज, पान टप-या सुरूच  

Coronavirus : थुंकणाऱ्यांवर कारवाईची गरज, पान टप-या सुरूच  

Next

- वैभव गायकर
पनवेल : कोरोनाच्या संसर्गापासून शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, मॉल्स, पानटपºया, शोरूम्स आदींसह लहान-मोठी दुकाने बंद करण्याचे आदेश बुधवारी पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त गणेश देशमुख यांनी लागू केले आहेत. मात्र तरीही काही बेजबाबदार नागरिक आदेशाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पानटपऱ्यांवरील मसालाजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर सर्रास थुंकण्याचा प्रकार अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याबाबत कडक कारवाईची गरज आहे.

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजन राबविल्या जात आहेत. काही दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. तर काही अज्ञानी नागरिकांकडून तंबाखूजन्य पदार्थांच्या पिचकाºया सर्रास रस्त्यांवर उडवल्या जात आहेत.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे इतरांच्या आरोग्यास धोकादायक आहे. हा गुन्हा असून दंडात्मक कारवाईचीही तरतूद आहे. प्रशासन कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत असताना अनेक जण रस्त्यावर, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक तसेच शहरातील चौक आदी ठिकाणी पिचकाºया उडवताना दिसत आहेत. यामध्ये पादचाºयांपासून दुचाकी, चारचाकी चालकांचा समावेश आहे. प्रत्येकाने याबाबत गंभीर राहण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पानटपºयांतून सर्वात जास्त तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. या टप-या बंद करण्याचे आदेश पारित केले असताना अशा प्रकारे सर्रास दुकाने उघडी ठेवणाºयांवर कारवाईची आवश्यकता आहे.

सध्याच्या घडीला प्रत्येक लहानातली लहान खबरदारी प्रत्येकाने घेणे, हे आपले कर्तव्य आहे. उघड्यावर थुंकल्यास संसर्गाची शक्यता अधिक असते. नागरिकांनी उघड्यावर थुंकणे टाळणे गरजेचे आहे.
- डॉ. वैभव मोकल

Web Title: Coronavirus : The need for action on the spitters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.