शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

CoronaVirus Lockdown News: आजपासून दोन दिवस शहरात कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:36 AM

जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच उघडी

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे शनिवार व रविवार दोन दिवस नवी मुंबईमध्येही कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणतीही दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर फिरता येणार नाही. हॉटेलमध्ये पार्सल आणण्यासाठीही जाता येणार नाही. परंतु हॉटेलमध्ये फोन करून घरी पार्सल मागविण्यास परवानगी देण्यात आली आहे.नवी मुंबईमध्ये प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णालयांमध्ये जागा कमी पडू लागली आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्स युनिटमध्ये जागा उपलब्ध नाही. सर्वांना उपचार मिळवून देताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. कोरोना रोखण्यासाठी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहेत. परंतु अनेक नागरिक चोरून दुकाने सुरू ठेवत आहेत. अद्याप भाजी मार्केट व इतर ठिकाणी गर्दी होत आहे. यामुळे शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. मॉल्स, सलून, फर्निचर व इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ६ एप्रिलपासून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक बार व मॉल्सकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तुर्भेमधील एक बार सात दिवसांसाठी सील केला आहे. पुढील दाेन दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेणे बंदशासनानियमाप्रमाणे हॉटेलचालकांना फक्त पार्सल देण्यास परवानगी दिली होती. परंतु शनिवार व रविवारी नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही. परंतु हॉटेलमध्ये फोन करून किंवा ऑनलाइन डिलीव्हरी देणाऱ्यांकडून घरपोच पार्सल पुरविण्यास परवानगी असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.डोळ्यांचे दवाखाने सुरूपुढील दोन दिवस सनदी लेखापालांची कार्यालये सुरू ठेवली जाणार आहेत. याशिवाय डोळ्यांचे दवाखाने व चश्मा बनवणारी दुकानेही सुरू ठेवली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या