शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: September 3, 2015 03:01 IST

कामगार कायद्यातील बदलांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात जेएनपीटी बंदरातील कामगार संघटनांच्या सहभागामुळे बुधवारी बंदरातील कंटेनर हाताळणीचे कामकाज पूर्णत

उरण : कामगार कायद्यातील बदलांविरोधात १० केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात जेएनपीटी बंदरातील कामगार संघटनांच्या सहभागामुळे बुधवारी बंदरातील कंटेनर हाताळणीचे कामकाज पूर्णत: बंद पडले. उरणमधील राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाजही दिवसभर ठप्प होते. जेएनपीटी बंदराअंतर्गत असलेली जीटीआय आणि दुबई पोर्ट या दोन्ही बंदरातील आणि बंदरांवर आधारित बहुतांश सीएफएस, सीडब्ल्यूसी गोदामातील कामकाज सुरळीत सुरू होते. त्यामुळे उरण औद्योगिक क्षेत्रातून तरी संपाला काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला.कंटेनर आयात-निर्यातीचेच काम ठप्प झाल्याने एकाही कंटेनरची चढ-उतार झाली नसल्याची माहिती बंदराचे मुख्य वरिष्ठ प्रबंधक नरेंद्र कुमार यांनी दिली. जेएनपीटी प्रशासन भवनातही अग्निशमन, हॉस्पिटल आदी अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त २०० अधिकारी कामावर हजर होते. त्यामुळे संपाचा प्रशासनाच्या कामकाजावर फारसा परिणाम जाणवला नसल्याचेही जेएनपीटीकडून सांगण्यात आले. जेएनपीटी बंदरावर आधारित जीटीआय आणि दुबई पोर्ट या दोन्ही खासगी बंदरावर संपाचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे बंदराचे काम सुरळीपणे सुरू असल्याची माहिती जीटीआय बंदराचे अधिकारी राजेश सिंग यांनी दिली. न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले सीएफएस, सीडब्ल्यूसी गोदामांतील कामकाजही सुरळीत सुरू होते अशी माहिती न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. राजेंद्र देवरे यांनी दिली. उरण येथील ओएनजीसी प्रकल्पातील एकही कामगार संघटना संपात सहभागी झाली नाही. त्यामुळे प्रकल्पातील कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मुख्य प्रकल्प अधिकारी एस. के. साहू यांनी दिली. (वार्ताहर)