शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांची ३५१ कामे पूर्ण

By admin | Updated: October 29, 2015 23:39 IST

संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’स रायगड जिल्ह्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येत

जयंत धुळप,  अलिबागसंपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’स रायगड जिल्ह्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत, रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ४५ गावांची निवड करण्यात आली असून त्यात एकूण १ हजार ३४२ बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी सप्टेंबर अखेर ३५१ कामे पूर्ण झाली असून १४ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यावर आतापर्यंत ७ कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.जिल्ह्यात पूर्ण झालेल्या ३५१ बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात अडवण्यात आणि जमिनीत जिरवण्यात यश आले आहे. या जलयुक्त बंधाऱ्यांमुळे त्या आसपासच्या विहिरींच्या जलपातळीत यंदा वाढ दिसून आली तर बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग भातशेतीस झाल्याचे निष्कर्ष कृषी विभागाचे आहेत. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३४२ बंधाऱ्यांच्या कामांसाठी ४२ कोटी ४८ लाख४९ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात २९ कोटी ५४ लाख ८७ हजार रुपये तर जिल्ह्यातील विविध कारखाने व उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मुंबईतील श्रीसिध्दिविनायक न्यासाने रायगड जिल्ह्यास एक कोटी रुपयांचा निधी दिला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करण्याकरिता आणखी १० कोटी ९३ लाख ६२ हजार रु पये निधीची आवश्यकता आहे.