शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवासी जागांचा व्यावसायिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2015 00:24 IST

कोणतीही परवानगी न घेता निवासी जागांचा बिनबोभाटपणे व्यावसायिक वापर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे सिडकोचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबईकोणतीही परवानगी न घेता निवासी जागांचा बिनबोभाटपणे व्यावसायिक वापर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे सिडकोचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याची गंभीर दखल घेत यासंदर्भात निश्चित धोरण आखण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या प्रस्तावित धोरणामुळे शहरात बोकाळलेल्या ‘निचे दुकान, उपर मकान’ या प्रवृत्तीला ब्रेक लागेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे.सिडकोने गेल्या चार दशकांत शहराच्या विविध भागात जवळपास दीड लाख घरांची निर्मिती केली आहे. यातील पन्नास टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी आहेत. तीन मजल्यापर्यंतच्या इमारतींसह बैठ्या घरांचा यात समावेश आहे. मात्र कालांतराने या बैठ्या घरांचे टुमदार बंगल्यात रूपांतर झाले आहे. यातील तळमजल्याच्या जागेवर दुकान थाटून घरमालक वरच्या मजल्यावर राहत आहेत. विशेष म्हणजे निवासी जागेत व्यवसाय करण्यासाठी जागेचा चेंज आॅफ युज (वापरात बदल) करून घेणे नियमाने बंधनकारक आहे. परंतु हा बदल करताना अतिरिक्त शुल्क भरावे लागत असल्याने अनेकांनी या नियमाला बगल दिल्याचे पाहावयास मिळते. भविष्यात अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी निश्चित धोरण आखण्याच्या दृष्टीने सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत. सीबीडी, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका काम पहाते. त्यामुळे कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल, द्रोणागिरी, उलवे या नोड्समध्ये निवासी जागांच्या व्यावसायिक वापरासाठी कठोर नियमावली आणण्याचा सिडकोचा विचार आहे. लवकरच त्याबाबतचे धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिली.