शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड बाजारमुळे गोंधळ

By admin | Updated: December 11, 2015 01:25 IST

रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत

अलिबाग : रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबरला ठेवली आहे. त्यामुळे सत्ताधारी शेकापपुढे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. अलिबाग येथील अ‍ॅड. सागर पाटील आणि किशोर अनुभवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची याचिका ३० नोव्हेंबर २०१५ ला दाखल केली आहे. रायगड बाजारच्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात भाजपाचे अ‍ॅड.महेश मोहिते यांनी याचिका दाखल केली आहे, तर दुसरीकडे अ‍ॅड. सागर पाटील आणि किशोर अनुभवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे रायगड बाजारमुळे अलिबागची अख्खी नगरपालिका गोत्यात आल्याचे बोलले जाते. काँग्रेस आणि भाजपाने या प्रश्नी शेकापला चांगलेच कोंडीत पकडले असल्याचे चित्र आहे.अलिबाग नगर पालिकेच्या मालकीची स.नं.७ /२ सि.स.नं.१३२४ मधील १२४० चौ.मी. जागेच्या भाडे मूल्यांकन आणि निविदेबाबत अलिबाग नगर पालिकेने २२ मे २०१५ला सर्वसाधारण सभा घेतली होती. यासाठी ६२० क्रमांकाचा ठरावही घेतला होता. तो चुकीचा असून ठराव रद्द करावा आणि बांधकाम निष्कासित करुन ही जागा पुन्हा अलिबाग नगर पालिकेच्या ताब्यात द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यानंतर १ जून २०१५ ला झालेल्या सर्वसाधरण सभेमध्ये श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ लि.ला भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा मुद्दा होता. यासाठी ६२१ ठराव क्रमांकाने नगर पालिकेने ठराव घेत श्रीबाग संस्थेला जमीन दिली. मुळात या जमिनीचे मूल्यांकन बाजार भावाप्रमाणे नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हाही ठराव बेकायदा असल्याने म.न.न.प. औद्योगिक नगर अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये नगर पालिका तहकूब करणे आणि सर्व सदस्य अनहर्त करावेत, अशीही मागणी केली आहे. (प्रतिनिधी)