शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये सिडकोची सार्वजनिक सायकल योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:05 IST

सेंट्रल पार्कमध्ये सेवा; शेअरिंग सिस्टीम तत्त्वावर सुरुवात

पनवेल : खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून सार्वजनिक सायकल योजना रविवारी सुरू करण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर तसेच व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या उपस्थितीत सेंट्रल पार्क मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. यापूर्वी दोन वेळा व्यवस्थापकीय संचालकांना वेळ मिळत नसल्याने या सेवेचे उद्घाटन रद्द करण्यात आले होते.संबंधित सायकल योजना ही पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टीम या तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. शहरात याकरिता स्थानके उभारली जाणार आहेत. पुणे आणि बंगळुरूच्या धर्तीवर ही सेवा खारघर शहरात सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेनेही ही सेवा शहरातील नागरिकांसाठी सुरू केली आहे. या सेवेचा विस्तार खारघर शहरापासून नवीन पनवेलपर्यंत करण्यात येणार असल्याचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले.तसेच व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व प्रदूषणावर मात करण्यासाठी सिडकोचे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगितले. शहरातील सर्वच नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. सिडकोने याकरिता युलू बाइक्सला एक वर्षाची मंजुरी दिली आहे.उद्घाटनाप्रसंगी प्रभाग ‘अ’चे सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेविका वनिता पाटील, नगरसेविका आरती नवघरे, ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, बिना गोगरी, दीपक शिंदे, मंगल कांबळे, सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, खारघरचे प्रशासक रमेश गिरी, संजय पुदाळे आदीसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.