शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडपात लागले सीसीटीव्ही

By admin | Updated: September 24, 2015 00:39 IST

सुरक्षिततेबाबत सूचना करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश केल्यानंतर शहरातील अनेक मंडळे खडबडून जागी झाली आहेत.

नवी मुंबई : सुरक्षिततेबाबत सूचना करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश केल्यानंतर शहरातील अनेक मंडळे खडबडून जागी झाली आहेत. यासंदर्भात पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीनंतर अनेक मंडळांनी उत्सव काळात सीसीटीव्ही व सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिल्याचे दिसून आले आहे.गणेशोत्सव काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या आवाहनानंतरही अनेक मंडळांनी गांभीर्य न घेत गणेशमूर्तींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दाखवला आहे. परिणामी अशा मंडळांतील गणेशमूर्तींची सुरक्षा धोक्यात असून त्याठिकाणी धार्मिक तेढ करणारे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकमतने सार्वजनिक मंडळांचे स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केला होता. याची दखल घेत परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक मंडळाच्या सुरक्षेची चाचपणी करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार पाहणी करुन सुरक्षेत निष्काळजीपणा करणाऱ्या मंडळांना खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांनी केल्या होत्या. पाहणीमध्ये संपूर्ण शहरात मोठी मंडळे वगळता इतर बहुतांश मंडळात सीसीटीव्ही तसेच स्वयंसेवक नेमलेले नसल्याचे समोर आले होते. अशा मंडळांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. घणसोलीच्या शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाने उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. यापूर्वी त्यांनी उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नव्हते. मात्र लोकमतच्या वृत्तानंतर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेवून उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवल्याचे मंडळाचे संस्थापक कृष्णा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)