शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत

By admin | Updated: October 31, 2015 00:18 IST

हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटणाऱ्या चौघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून या व्यावसायिकांना घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच मित्रांच्या मदतीने

नवी मुंबई : हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटणाऱ्या चौघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून या व्यावसायिकांना घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच मित्रांच्या मदतीने हा कट रचला होता. यामध्ये ४३ हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली होती.ऐरोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या यादव देवाडिया (५९) यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. त्यांचे घणसोली येथे हॉटेल असून रोज रात्री हॉटेल बंद केल्यानंतर ते रिक्षाने घरी जायचे. यानुसार काही दिवसांपासून ते एकाच रिक्षाने घणसोली ते ऐरोलीपर्यंतचा प्रवास करत होते. बुधवारी रात्री नेहमीच्या रिक्षाने घरी जात असताना सहप्रवासी म्हणून बसलेल्या तिघांनी त्यांना लुटले होते. या तिघांनी देवाडिया यांच्यावर चाकू हल्ला करून ४३ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये रिक्षाचालकाचाही समावेश असून त्याने गुन्ह्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. सूरज पवार (२८) असे रिक्षा चालकाचे नाव असून कैलास डिडोळे (१९), मोहन थापा (२०) व राज अधिकारी (१९) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. सर्व जण घणसोलीतील रहिवाशी आहेत. सूरज परिसरात भाड्याची रिक्षा चालवतो. त्याने देवाडिया यांना सलग काही दिवस रिक्षातून ऐरोलीपर्यंत सोडले होते. यानुसार त्याने मित्रांच्या मदतीने त्यांना लुटण्याचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी तो देवाडिया यांना घेवून जात असताना घणसोली रेल्वे पुलालगत थांबलेले त्याचे तीन साथीदार प्रवासी म्हणून रिक्षात बसले. यानंतर ऐरोलीच्या पटनीमार्गे युरो स्कूलजवळ त्यांनी देवाडिया यांच्या गळ्यावर चाकूने जखम करून त्यांच्याकडील पैशाची बॅग पळवली. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर व उपनिरीक्षक पिंपळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान रिक्षा चालक सूरज याच्या वागण्यावर त्यांना संशय आला. अधिक तपासात त्याचा मित्र कैलास डिडोळे याच्याविषयीची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)