बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

By Admin | Updated: January 5, 2016 00:58 IST2016-01-05T00:58:30+5:302016-01-05T00:58:30+5:30

गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एक फेरीवाला व त्याला मदत करणाऱ्या महिलेचा समावेश आहे.

Both of them were arrested in the rape case | बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

नवी मुंबई : गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये एक फेरीवाला व त्याला मदत करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. फेरीवाल्याकडून हजार रुपये घेऊन तरुणीला स्वत:च्या घरी बोलावून बलात्कारासाठी मदत केल्याचा आरोप अटकेतील महिलेवर आहे.
नेरूळ सेक्टर २० परिसरात ही घटना घडली आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या एका गतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. सदर तरुणीच्या पोटात दुखत असल्याने तिची वैद्यकीय तपासणी झाली असता ती गरोदर असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली होती. चौकशीत या तरुणीने दीड महिन्यापूर्वी तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी एका व्यक्तीला व त्याला सहकार्य करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. संदीप सपकाळ (३८) व मनीषा पवार (३०) अशी त्यांची नावे आहेत.
दोघेही त्याच परिसरातले राहणारे असून संदीप हा फेरीवाला आहे. घटनेच्या दिवशाी मनीषा हिने तरुणीला स्वत:च्या घरी बोलावून घेतले होते. यावेळी अगोदरच तिथे उपस्थित असलेल्या संदीपने तिच्यावर बलात्कार केला होता. यासाठी तिने संदीपकडून एक हजार रुपये घेतले होते. त्यानुसार गतिमंद तरुणीला घरी बोलावले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Both of them were arrested in the rape case