शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

वादळात सापडलेल्या नौका दमणमध्ये

By admin | Updated: September 23, 2015 03:56 IST

सातपाटीच्या बंदरातून समुद्रात मच्छीमारीला गेलेल्या सहा नौका समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळामध्ये सापडल्या. मुसळधार पाऊस, तुफानी वादळी वारे आणि लाटांशी जिवघेणी झुंज

पालघर : सातपाटीच्या बंदरातून समुद्रात मच्छीमारीला गेलेल्या सहा नौका समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळामध्ये सापडल्या. मुसळधार पाऊस, तुफानी वादळी वारे आणि लाटांशी जिवघेणी झुंज घेत ८६ खलाशी व तांडेल भरकटलेल्या अवस्थेत केंद्रशासीत दमणच्या समुद्रकिनाऱ्यावर सुखरूपणे पोहचल्या असल्या तरी दोन नौका खडकावर आदळून त्यांचे मोठे नुकसान झाले.सातपाटी बंदरातून ४०० ते ४५० लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. परंतु गणपती व गौरीचा सण साजरा करण्यासाठी नौकेमध्ये खलाशी कामगार म्हणून काम करणारे विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरी इ. भागातील बहुतांशी कामगार घरी गेल्याने बहुतांशी मासेमारी व्यवसाय ठप्प पडला होता. १४ सप्टेंबर रोजी सातपाटी मच्छीमार सहकारी संस्थेचे सभासद असलेले छबीलदास गणु मेहेर यांची ‘गौरीपुजन’, दिलखुश तांडेल यांची ‘साईगणेश’, नरेश तांडेल यांची ‘जलसुंदरी’ तर सर्वोदय सहकारी संस्थेच्या महादेव सोमला किणी यांची ‘विश्वकर्मा’, छबिलदास मेहेर यांची ‘आदिमाया’ व धिरज किणी यांची ‘रत्नसागर’ या सहा नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाल्या होत्या. चार दिवस मासेमारी केल्यानंतर १८ सप्टेंबरला रात्रौ १ वा. तुफानी वादळी वारे व मुसळधार पाऊस अचानक सुरू झाल्याने सर्व मच्छीमारांची एकच त्रेधरापीट उडाली. समुद्रात टाकलेली जाळी पटापट नौकामध्ये घेऊन आपण परतीचा प्रवास करावा असे सर्वानुमते ठरले. परंतु वाऱ्याचा मोठा झंझावात सुरू झाल्याने उसळलेल्या तुफानी लाटा चुकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले होते. त्यातच सर्व नौकावरील वायरलेस सेट नेटवर्क बंद पडल्याने या जवळपास असणाऱ्या सहाही नौकांचे संपर्क तुटले होते. सर्वत्र मिट्ट काळोख त्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर त्यामुळे समुद्राच्या प्रवाहाबरोबर या नौका वाट फुटेल त्या दिशेने भरकटत जात होत्या. प्रत्येक नौकेत असणाऱ्या १४ ते १५ खलाशी कामगार देवाचा धावा करीत जीवाची याचना करीत होते. (वार्ताहर)