शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 12:26 IST

बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी राजीनामा दिला आहे.

Sandeep Naik : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वाशीमध्ये बैठक घेऊन संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आजच संदीप नाईक यांची शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्याआधी संदीप नाईक यांनी पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठवला आहे. दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत संदीप नाईक यांनी पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपने गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्याने नाईक कुटुंबातून दोन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.

भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. पक्ष प्रवेशाआधी संदीप नाईक हे नवी मुंबईमध्ये मेळावा घेणार आहेत. दिलेला शब्द पाळला गेलेला नाही असं संदीप नाईक यांचे म्हणणं आहे. बेलापूर मतदारसंघात कार्यकर्ते नाराज असून त्यांची वेगळी भूमिका असणार असल्याचे संदीप नाईक यांनी म्हटलं आहे.

बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांच्या नावाची शक्यता असताना पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संदीप नाईक हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संदीप नाईक यांनी आज नवी मुंबईत निर्धार मेळावा आयोजित केला आहे. "बेलापूर मतदारसंघातील जनता आणि माझ्यासोबत अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत. पण जाहीरपणे आपली भूमिका काय आहे हे कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे. आजचा निर्धार मेळावा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. कार्यकर्ते जे सांगतील तो निर्णय मी घेणार आहे," असं संदीप नाईक म्हणाले.

"कार्यकर्त्यांचा कल ज्या दिशेला जाईल तो निर्णय मी आज घेणार आहे.  मागच्या वेळी मला शब्द दिलेला असतानाही तिकीट नाकारल्यानंतर त्यावेळी मी थांबलो. त्यावेळी मी सर्वांचा सन्मान केला. त्यावेळी पूर्ण ताकदीने काम केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे आज कार्यकर्त्यांचे मत असेल तो निर्णय घेईल," असेही संदीप नाईक म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024belapur-acबेलापूरGanesh Naikगणेश नाईकManda Mhatreमंदा म्हात्रे