शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलन

By admin | Updated: December 12, 2015 01:38 IST

गेल्या पाच वर्षांपासून येथील पश्चिम भागातील गांवदेवी मंदिर येथून चिंचपाडा कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी करून

अंबरनाथ : गेल्या पाच वर्षांपासून येथील पश्चिम भागातील गांवदेवी मंदिर येथून चिंचपाडा कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी करून ती देखील ती होत नसल्याने शुक्रवारी स्वाभिमानी संघटनेने पालिकेसमोर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलन करून लाक्षणिक उपोषण केले. पालिकेने प्राधान्याने दुरुस्ती करण्याचे लेखी पत्र दिल्यावर हे आंदोलन मागे घेतले. हा रस्ता रहदारीचा असतांनाही त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पालिकेने केलेले नाही. काँक्रीटीकरणाला विलंब होत असल्याने किमान या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि शहर संघटक विकास सोमेश्वर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. मात्र निधी अभावी दुरुस्तीची अडचण आल्याने स्वाभिमान संघटनेने या रस्त्याच्या कामासाठी भीक मांगो आंदोलन केले. पालिका कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी सर्व रिक्षा चालक आणि नागरिकांकडून भीक मागत निधी गोळा केला. यानंतर या आंदोलनाची काही वेळातच दखल घेऊन अंबरनाथच्या नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, बांधकाम सभापती सदाशिव पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता मनिष भामरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांना हा रस्ता निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानचे रेवण शिंदे, राहुल सोमेश्वर, प्रशांत चंदनशिव यांच्यासह गावदेवी ते करिम बिल्डींग भागातले स्थानिक रहिवासीही उपस्थित होते.(प्रतिनिधी)