शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीमधील आदिवासींना पोलिसांचा मायेचा आधार

By admin | Updated: October 29, 2015 23:48 IST

गडचिरोलीमधील आदिवासी नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन ट्रक साहित्य संकलित केले आहे. यामध्ये कपडे, भांड्यांसह खेळाच्या साहित्याचाही समावेश आहे.

नवी मुंबई : गडचिरोलीमधील आदिवासी नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन ट्रक साहित्य संकलित केले आहे. यामध्ये कपडे, भांड्यांसह खेळाच्या साहित्याचाही समावेश आहे. यामुळे तीन हजारपेक्षा जास्त कुटुंबीयांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी नवरात्री उत्सवाच्या दरम्यान गडचिरोलीमधील आदिवासींना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मुंबई, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये सण, उत्सव आनंदामध्ये साजरे होतात. उत्सवांवर करोडो रुपये खर्च केले जातात. पण येथून साडेसातशे किलोमीटर दूर असणाऱ्या गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांना मात्र प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. कपडे, भांडी व इतर अत्यावश्यक साहित्य घेतानाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यांच्याही जीवनात आनंद फुलवू या असे आवाहन पोलीस आयुक्त प्रभात रंजन, परिमंडळ एकचे उपआयुक्त विश्वास पांढरे व शहाजी उमाप यांनी केले होते. या आवाहनाला नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामधील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ९७ संघटना व राजकीय, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून जुने, नवे कपडे व भांडी संकलित केली. तब्बल तीन ट्रक साहित्य जमा झाले आहे. नवी मुंबई, पनवेलकरांनी तब्बल २४१ गोणी व बॉक्स भरून जुने कपडे दिली आहेत. मोठ्याप्रमाणात नवीन कपडेही भेट दिले आहेत. यामध्ये शर्ट, ट्रॅक पँट, टी शर्ट, साडी, पँटचे एकूण ५८०० नगांचा समावेश आहे. दिवाळीनंतर थंडी सुरू होणार. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ६०० ब्लँकेटही दिले आहेत. आदिवासींच्या घरामध्ये पुरेशी भांडीही नसतात यामुळे ताट, वाटी, ग्लास, प्लेट, पातेले यांचे ५१३० नगही दिले आहेत. नागरिकांकडून जमा केलेले साहित्य तीन ट्रकमध्ये भरून गुरुवारी सायंकाळी गडचिरोलीला पाठविण्यात आले. पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमास आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण, या मदतीसाठी परिश्रम करणारे परिमंडळ दोनचे उपआयुक्त विश्वास पांढरे, उपआयुक्त सुरेश मेंगडे, प्रशांत खैरे, अरविंद साळवी व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)