शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंचा गंडा घालणारा भामटा गजाआड

By admin | Updated: October 27, 2015 00:31 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पनवेल येथील शाखेमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून तब्बल ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज मिळविणाऱ्या भामट्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे

पनवेल : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पनवेल येथील शाखेमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून तब्बल ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज मिळविणाऱ्या भामट्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. कुवर रामचंद्र सिंग (३६) असे या भामट्याचे नाव असून त्याने पराग सारंग दामुदरे या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कुवर रामचंद्र सिंग हा कामोठे सेक्टर-२० मध्ये राहावयास असून त्याने गत जुलै महिन्यामध्ये पराग सारंग दामदुरे या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यानंतर त्याने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पनवेल शाखेमध्ये सदर बनावट कागदपत्रे सादर करून गृहकर्जासाठी अर्ज केला होता. याचदरम्यान त्याने याच बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने एका फायनान्स कंपनीकडे देखील गृहकर्जासाठी अर्ज केला होता. दरम्यान, स्टेट बँक आॅफ इंडियाने या बनावट कागदपत्रांच्या आधारावर कुवर सिंग याला तब्बल ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर करून त्याला चेक देवून टाकला. दरम्यान, आरोपी कुवर सिंग याने ज्या फायनान्स कंपनीकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता त्या एजन्सीला कुवर सिंग याने सादर केलेल्या कागदपत्रांवर संशय आल्याने त्यांनी कुंवर सिंगचा शोध सुरू केला होता. तसेच त्याने सदर कागदपत्रांचा वापर करून इतर बँकांकडून कर्ज घेतले असण्याची शक्यता असल्याने या फायनान्स कंपनीने विविध बँकांकडे या व्यक्तीबाबत चौकशी सुरू केली होती. चौकशीदरम्यान पनवेलच्या स्टेट बँकेकडून कुवर सिंग याने ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचे आढळून आल्यानंतर सदर फायनान्स कंपनीने स्टेट बँकेला कुवर सिंग याच्या बनावट कागदपत्रांची माहिती दिली. त्यामुळे बँकेने कुवर सिंग याच्या कृत्याची माहिती पोलिसांना देवून त्याला बँकेत बोलावून घेवून त्यानुसार तो बँकेत आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)