शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील हेलकाव्यांचा ‘ताप’

By admin | Updated: October 28, 2015 01:05 IST

आॅक्टोबर हीटच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदवले जात आहेत.

मुंबई : आॅक्टोबर हीटच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदवले जात आहेत. ३६ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान ३४ अंशावर स्थिरावले आहे. किमान तापमान २६ हून २४ अंशावर घसरले आहे. परिणामी आॅक्टोबर संपत असतानाच कमाल आणि किमान तापमानात होत असलेले बदल मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहेत. हिवाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना अशाच बदलत्या तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.आॅक्टोबर संपताक्षणी पश्चिमेकडील थंड वारे पूर्वेकडे वाहू लागतात आणि उत्तर भारताला थंडीचे वेध लागतात. सोमवारीच जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीसह पश्चिमेकडून पूर्वेकडून वाहणारे थंड वारे जोर पकडतात. हेच वारे कालांतराने दक्षिण भारताकडे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रसह लगतच्या राज्यांत थंडीचा कडका पडतो. सध्या हीच स्थिती आहे. पारा किंचित घसरला आहे. मुंबईसह परिसरात ढगाळ वातावरण असल्याने येथील उष्णतेचे प्रमाण कमी आहे. मात्र या बदलामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील ४८ तास मुंबई आणि परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)