तरुणाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा

By Admin | Updated: February 14, 2015 22:24 IST2015-02-14T22:24:57+5:302015-02-14T22:24:57+5:30

कर्जत तालुक्यातील साळोख तर्फ नीड या गावामध्ये एका डेव्हलपर्सचे बांधकाम सुरु झाले आहे. तेथे साळोखमधील एक दलित युवक बांधकाम साहित्य पुरवतो.

The assault of the young man; Crime against eleven | तरुणाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा

तरुणाला मारहाण; अकरा जणांवर गुन्हा

कर्जत : कर्जत तालुक्यातील साळोख तर्फ नीड या गावामध्ये एका डेव्हलपर्सचे बांधकाम सुरु झाले आहे. तेथे साळोखमधील एक दलित युवक बांधकाम साहित्य पुरवतो. हे बांधकाम साहित्य जवळच असलेल्या बार्णे गावातील काही जणांना पुरवायचे होते. त्यावरून गावातील अकरा जणांनी त्या युवकाला जबर मारहाण केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.
पकडलेल्या अकरा जणांना न्यायालयात हजर केले असता २८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
साळोख गावातील डेव्हलपर्सला प्रभाकर पांडुरंग गोतारणे हा दलित युवक बांधकाम साहित्य पुरवितो. या कंपनीला बांधकाम साहित्य पुरविण्याचा ठेका आम्हाला पाहिजे यावरून बार्णे गावातील राजन कुळकर्णी, साईनाथ मुने, दशरथ मुने, मधुकर मुने, प्रवीण दळवी, अंकुश मते, राहुल धुळे, सुधाकर धुमाळ, सुनील मुने ( सर्व राहणार बार्णे ), विनायक मारके (राहणार मार्केवाडी) आणि राजेंद्र शेळके ( राहणार तांबस ) या अकरा जणांनी दुपारी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली आणि लाठ्या-काठ्या, लोखंडी शिगा, सिमेंटच्या विटा व दगडांनी जबर मारहाण केली. यात गोतारणे गंभीर जखमी झाले. त्याला उपचारासाठी कर्जतच्या उपजिल्हालयात मात्र पुढील उपचाराकरिता ते अलिबाग जिल्हा रु ग्णालयात दाखल झाले आहेत.

Web Title: The assault of the young man; Crime against eleven