शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकावर खुनी हल्ला

By admin | Updated: December 11, 2015 01:35 IST

करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले

नवी मुंबई : करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले. जखमी अवस्थेमध्ये त्याने व्हिडीओ काढून मित्रांना पाठविला असून मी जगणार नाही, माझ्या घरच्यांना कळवा, असे आवाहन केले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री करावे परिसरातील रिक्षा चालकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मच्छींद्र भोईर या तरूणाने स्वत:चा व्हिडीओ पाठविला. मी भाडे घेवून उलवेला गेला होतो. फॅमिली होती म्हणून गेलो. तेथून येताना चार जण भेटले. किल्ला गावठाणजवळ जायचे असल्याचे सांगितले. मी त्यांना गाडीत बसविले. ते दारू पिले होते. त्यांनी रिक्षा आडवळणाला घेण्यास सांगितले. मला मारहाण केली. मला खूप लागले आहे. आमच्या घरी लवकर सांगा. मी वाचणार की नाही सांगता येत नाही, हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरील वेदना व्हिडीओवर स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमुळे करावे व बेलापूर परिसरात खळबळ उडाली आहे. रिक्षा चालकांनी याविषयी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी डॉगस्क्वॉड घेवून पाहणी केली असता उरणकडे जाणाऱ्या जुन्या पुलाजवळ रिक्षा आढळली. रिक्षातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. शोधाशोध करूनही मच्छींद्र सापडलाच नाहती. परिसरातील १०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी बेलापूर ते उरण परिसरातील खाडी परिसरात दिवसभर शोध घेतला परंतु काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांनीही शोध मोहीम सुरू केली आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत तो सापडला नसल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रसन्ना कडू यांनी दिली आहे. रिक्षा चालकांनी दिवसभर रिक्षा बंद करून सहकाऱ्याचा शोध सुरू केला होता. चालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून लवकर तपास लावण्याची मागणी केली आहे.