शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तन-विरार सी लिंक’साठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा जाणार बळी

By नारायण जाधव | Updated: March 22, 2026 07:53 IST

केंद्रीय परिवेश समितीची मिळाली मंजुरी : प्रकल्पासाठी ८७,४२७.१७ कोटींचा खर्च प्रस्तावित.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या महत्त्वाकांक्षी उत्तन-विरार सी-लिंक प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीने ११ मार्चच्या ४३९ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी रुपये ८७,४२७.१७ कोटींचा खर्च प्रस्तावित असून, यात मुख्य समुद्री पूल, ॲप्रोच रस्ते, इंटरचेंजेस, जमीन संपादन व पुनर्वसनाचा समावेश आहे. या सी लिंकसाठी तब्बल १०० हेक्टर खारफुटीचा बळी जाणार आहे. 

या प्रकल्पामुळे सध्या ९० मिनिटांहून अधिक लागणारा प्रवास ३०-४० मिनिटांवर येईल. प्रकल्पाची एकूण लांबी ५५.१२ किमी असून, त्यात उत्तन ते विरारदरम्यान २४.३५ किमीचा ४ ४ पदरी मुख्य समुद्री पूल पूर्णपणे एलिव्हेटेड स्वरूपात असेल. उत्तन (मीरा-भाईंदर) कनेक्टर (३ ३ लेन) ९.३२ किमी लांबीचा आहे. त्यात ६.३ किमी एलिव्हेटेड, १.८९५ किमी ॲट-ग्रेड व १.१२४ किमी बोगदा असेल. वसई कनेक्टर २.५ किमी पूर्णपणे एलिव्हेटेड राहील. तर विरार कनेक्टर (३ ३ लेन) १८.९५ किमी लांबीचा असून त्यात १२.८७ किमी एलिव्हेटेड, ५.७५ किमी ॲट-ग्रेड व ०.३३ किमी बोगदा असेल. 

४० हेक्टर वनजमीनसुद्धा बाधित

पर्यावरणीय दृष्टीने प्रकल्प संवेदनशील ठरत असून सुमारे ७० ते १०० हेक्टर खारफुटी क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. याशिवाय ३० ते ४० हेक्टर वनजमीन वापरावी लागणार असून सुमारे ४ ते ६ हजार झाडांची तोड अपेक्षित आहे. पिलर्स, ॲप्रोच रस्ते व इंटरचेंजेसमुळे खारफुटीवर थेट व अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.

नुकसानभरपाईसाठी खारफुटीचे १:३ प्रमाणात पुन:लागवड, पर्यायी ठिकाणी मँग्रोव्ह क्षेत्र विकसित करणे,  तसेच प्रत्येक झाडाच्या बदल्यात ३ ते ५ झाडे लावण्याचे नियोजन आहे. समुद्रातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी एलिव्हेटेड डिझाइनचा अवलंब केला जाईल. तुंगारेश्वर अभयारण्यातील ४.६१६८ हेक्टर राखीव वनक्षेत्र प्रभावित होणार असून वन्यजीव संवर्धनाचे मोठे आव्हान आहे.

थोडक्यात प्रकल्प 
लांबी : ५५.१२ किमी
मुख्य सी-लिंक : २४.३५ किमी
खारफुटी    ७०–१०० हेक्टर
वनजमीन    ३०–४० हेक्टर
झाडे    ४–६ हजार
इंटरचेंज    ३–४

 

English
हिंदी सारांश
Web Title : Uttan-Virar Sea Link: 100 Hectares of Mangroves to be Lost

Web Summary : The Uttan-Virar Sea Link project, approved by the environment ministry, will cost ₹87,427.17 crores. The 55.12 km link aims to reduce travel time significantly. However, it will result in the loss of 70-100 hectares of mangroves and 40 hectares of forest land, requiring the cutting of 4,000-6,000 trees. Reforestation is planned as compensation.
टॅग्स :Seaसमुद्रSea Routeसागरी महामार्गVirarविरारMira Bhayanderमीरा-भाईंदर