शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शंभर जणांनी थकविले तब्बल ६० कोटी

By admin | Updated: November 14, 2015 02:06 IST

महापालिका पाणीपुरवठा विभागाने मोठ्या १०० थकबाकीधारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्याकडून ६० कोटी रुपये येणे आहे.

उल्हासनगर : महापालिका पाणीपुरवठा विभागाने मोठ्या १०० थकबाकीधारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्याकडून ६० कोटी रुपये येणे आहे. एका महिन्यात पाणीबिल भरा, अन्यथा जप्तीला सामोरे जाण्याच्या नोटिसा काढल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दिली.उल्हासनगर पालिकेचे घरगुती पाणीबिल मालमत्ताकरात समाविष्ट असून वाणिज्य बिल स्वतंत्रपणे दिले जाते. त्याची थकबाकी १५० कोटींच्या पुढे गेल्याने सर्वाधिक १०० थकबाकीधारकांची यादी मनपाने प्रसिद्ध केली आहे. त्यांच्याकडे ६० कोटी ८४ लाख रुपये थकबाकी आहे. एका महिन्यात ती भरा, अन्यथा संपत्ती जप्तीच्या नोटिसा दिल्या असून यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात २०० पेक्षा जास्त जीन्स उद्योग, सेंच्युरी केमिकल कारखान्यांसह लहान-मोठे असंख्य उद्योग आहेत. पालिका त्यांना वाणिज्य दराने पाणीपुरवठा करीत असून यापैकी अनेकांनी पाणीबिल भरले नसल्याचे उघड झाले आहे. पाणीपुरवठा विभागाने त्यांच्याकडे ते भरण्यासाठी साकडे घातल्यानंतरही दाद देत नव्हते. अखेर, विभागाने जप्तीच्या नोटिसा काढून कारवाईचे संकेत दिले आहेत.