शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी उच्च न्यायालयात दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:27 IST

न्याय्य हक्कांसाठी कामगार संघटनेचा लढा; किमान वेतन देण्याची मागणी

पनवेल : पनवेल महापालिका आणि सिडको महामंडळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या आझाद कामगार संघटनेने कामगारांच्या मूलभूत मागण्या मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात कामगारांना मिळत नसलेल्या मूलभूत हक्कांप्रकरणी याचिका दाखल केली आहे.

पनवेल महापालिकेतील ठेकेदाराकडे काम करणाऱ्या सफाई कामगारांचे पगार वेळेत होत नाहीत, हक्काच्या सुट्ट्या दिल्या जात नाहीत, पगाराची स्लिप दिली जात नाही, कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जात नाही, अशा विविध मागण्यांसाठी आझाद कामगार संघटना काम करीत आहे. कंत्राटी कामगार अधिनियम १९७० मधील तरतुदींनुसार कोणताही कामगार एखाद्या शासकीय अथवा खासगी आस्थापनामध्ये २६० दिवस सलग कार्यरत असेल व ते काम कायमस्वरूपाचे असेल तर अशा कामगाराला त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे बंधनकारक असते.

किमान वेतन मिळणे, त्यांना वर्षाला ठरवून दिलेल्या हक्काच्या सुट्ट्या मिळणे व सुट्ट्या घेतल्या नसतील अथवा दिल्या नसतील तर त्या सुट्ट्यांचा पगार कामगारांना देणे, कामाच्या स्वरूपानुसार कामगारांना सोई-सुविधा, साधनसामग्री पुरविणे, कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी व कामगार आरोग्य विमा वगैरेची तरतूद करणे इत्यादी अनेक जबाबदाºया या कंत्राटदार व संबंधित आस्थापना यांनी पार पाडणे कायद्याने बंधनकारक असल्न्याची माहिती महादेव वाघमारे यांनी दिली. पनवेल महापालिका, सिडको, रायगड भवन तसेच नवी मुंबईतील रेल्वे स्थानकात सफाई कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळेल, असा विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला. अ‍ॅड. विजय कुर्ले हे न्यायालयात मांडत आहेत.

सुरक्षेकडे दुर्लक्ष

कंत्राटदारांकडून कामगारांचे आरोग्य, सामाजिक सुरक्षा तसेच आवश्यक साधनसामग्रीकडे दुर्लक्ष होत असून पत्रव्यवहार करूनही पूर्तता न केल्यामुळे याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र