शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी कर्मचाऱ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Updated: October 28, 2015 01:06 IST

राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

नवी मुंबई : राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून, सर्व नागरिकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहन केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. देशातील सर्व नैसर्गिक आपत्तींमध्ये येथील कर्मचारी व व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. २०१२ मधील दुष्काळावेळी माथाडी कामगारांनीही मदत केली होती. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिणकर, माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांना दिला आहे. माथाडी संघटनाप्रणीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व कर्मचारी संघटना व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी सेनेने पत्र देऊन या प्रस्तावास सहमती दिली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली आहे.बाजार समिती मुख्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन केले. सचिव शिवाजी पहिणकर यांनी यासाठी दिलेल्या प्रोत्साहनासाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला. पहिणकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. शेतकरी टिकला तर बाजार समित्या टिकणार आहेत. शेकरी संकटात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अविनाश देशपांडे, बी. डी. कामिटे, डी. जी. माकोडे, सीताराम कावरके, शिवनाथ वाघ, मिलिंद सूर्याराव, संदीप बोटे, कर्मचारी सेनेचे सुनील थोरात, नारायण महाजन, सुनील म्हात्रे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)