तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनिता राठोड हिची निवड

By Admin | Updated: July 28, 2015 01:27 IST2015-07-28T01:27:32+5:302015-07-28T01:27:32+5:30

कत्याच अमरावती येथे झालेल्या २९व्या कॅडेट सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू अनिता राठोड

Anita Rathod selected for Taekwondo National Championship | तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनिता राठोड हिची निवड

तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनिता राठोड हिची निवड

नवी मुंबई : नुकत्याच अमरावती येथे झालेल्या २९व्या कॅडेट सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू अनिता राठोड हिने सुवर्ण पदक संपादन केले. तिने ११ ते १४ कॅडेट वयोगटाच्या ४१ किलो वजनी गटात विजय मिळविले. २ ते ५ आॅगस्ट या कालावधीत तेलंगणा, हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे.
५ जुलै रोजी बदलापूर येथे झालेल्या कॅडेट सब ज्युनिअर स्पर्धेत नवी मुंबई शहरातील अनिता राठोड, पूनम नवले, राहुल राठोड या खेळाडूंनी सुवर्ण पदक संपादन केले आहे. यामधील अनिता राठोड ही हैदराबाद येथील तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anita Rathod selected for Taekwondo National Championship