शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

‘बाराबंगला’त ‘एंजल्स पॅराडाइज’ थीम पार्क

By admin | Updated: November 18, 2016 02:56 IST

दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या निसर्गरम्य अशा ठाणे पूर्वेतील बाराबंगला परिसरात लवकरच ‘एंजल्स पॅराडाइज’ थीम पार्क उभे राहणार आहे.

ठाणे : दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या निसर्गरम्य अशा ठाणे पूर्वेतील बाराबंगला परिसरात लवकरच ‘एंजल्स पॅराडाइज’ थीम पार्क उभे राहणार आहे. ठाणे शहरात ठिकठिकाणी असलेल्या उद्यानांची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून बिकट आहे. त्यात मैदानेही नसल्याने लहानग्यांच्या खेळण्याची सवय कमी होत चालली आहे. परंतु, लहानग्यांबरोबर मोठ्यांचेही मनोरंजन व्हावे, यासाठी बाराबंगला येथे थीम पार्क ठाणे महापालिका उभारत आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या या परिसरात पूर्व आणि पश्चिमेतील नागरिकांची सकाळ संध्याकाळी वर्दळ असते. जॉगिंग, व्यायाम, गप्पाटप्पा करण्यासाठी, निवांत बसण्यासाठी किंवा अभ्यासासाठी विद्यार्थी या ठिकाणी येतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची करमणूक व्हावी, यादृष्टीने महापालिका सर्व सोयीसुविधायुक्त असे थीम पार्क सुमारे ४ कोटी रु पये खर्च करून उभारण्यात येत आहे. या थीम पार्कमध्ये २००० फूट लांबीचे सिंथेटिक ट्रॅक, जॉगर्स ट्रॅक, १५ ते २० फायबरच्या विविध प्रतिकृती, फायबर मेकचे १०० विद्युत दिवे, शोभिवंत्कारंजे व धबधबे, अस्तित्वातील भिंतीची दुरुस्ती करून त्यावर रंगचित्रे काढणे, पाथ वे, मुलांना अभ्यासासाठी व खेळण्यासाठी जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा, शोभिवंत झाडे, फुलझाडे, आसनव्यवस्था, अद्ययावत प्रवेशद्वार आदी विविध सुविधा असणार आहेत. टप्प्याटप्प्याने या पार्कचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, सिक्युरिटी केबिन कम बॅगेज काउंटर, कारंजे, काही ठिकाणी नवीन पाथ वे, जुन्या पाथ वेचे नूतनीकरण, कॉलोनेड वॉल, आउट डोअर फिटनेस साहित्य आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली. पुढील टप्प्यांत उर्वरित कामे पार पडणार आहेत. १० दिवसांत पहिल्या टप्प्यास सुरुवात होईल. (प्रतिनिधी)