शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत पाण्याचा गैरवापर

By admin | Updated: October 28, 2015 23:27 IST

कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.

तळोजा : कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. मुळात म्हणजे एका घरामागे एक पाण्याचे कनेक्शन असताना परिसरातील रहिवासी या कनेक्शनला १ एचपी, २ एचपीच्या मोटारी लावून पाणी वापरत आहेत. यामुळे घराच्या वर असलेल्या ३ मजल्यापर्यंत पाणी पुरवणे सोपे होते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरु असून यामुळे पाण्याचा गैरवापर होत आहे. शिवाय या ठिकाणाप्रमाणे कळंबोलीत काही ठिकाणी पाण्याच्या जोडणीला मीटर नसल्याने सिडकोकडून किरकोळ रुपयात पाणी मिळायचे. मात्र आता उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलेले आहे. या प्रकरणी सिडकोचे संजय भाटिया यांच्याकडे कळंबोली शहरातील या भागांचा लेखाजोखा पाणीपुरवठा विभागाने मांडला असून यावर लवकरच अंमलबजावणी होणार आहे.कळंबोली परिसरातील एलआयजी, केएल १, केएल २ या भागात सुमारे ६५ हजार लोकवस्ती असून यातील एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे मजले दिवसेंदिवस चढत आहेत, त्यामुळे या परिसरात सिडकोला गरजेपेक्षा अधिक पाणी द्यावे लागत आहे. त्या शिवाय पाणी ओढण्यासाठी मोटारीची स्पर्धा येथे लागत आहे. सिडकोच्या जलवाहिनीतला दाब कमी असल्याने या लोकांना त्याची गरज लागत आहे, मात्र आता या परिसराला मुबलक पाणी पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार असून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)