शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती आणि व्यावसायिक वापराचे १५२ सिलिंडर जप्त

By admin | Updated: December 14, 2015 02:21 IST

घरगुती सिलिंडरचे गोदाम फोडून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : घरगुती सिलिंडरचे गोदाम फोडून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५२ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या टोळीकडून सिलिंडर विकत घेणाऱ्या चारजणांनाही पोलिसांनी जेरबंद केले.कल्याणच्या तळोजा रोडवरील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गोदाम सिलिंडरची चोरी प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण परिसरात अशाच प्रकारची टोळी मुंब्रा रेल्वे स्थानक भागात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती. जलाल युसुफ खान उर्फ लम्बू (४५) रा. अंबरनाथ, झहीर बाबर खान उर्फ राजू (३२)रा. डायघर, ठाणे, सईद अहमद उर्फ सोनू शरीफ खान (१९) रा. खारेगाव, ठाणे आणि राजेश रामचंद्र धनवडे (२८) रा. अंबरनाथ यांना ४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. भारत गॅस आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे १५२ सिलिंडर, तसेच चोरी करताना वापरलेली गाडी असा सहा लाख ४४ हजार ६७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचे सिलिंडर विकत घेणाऱ्या अतिक अहमद मोहमद अस्लम अन्सारी, सुधाकर नाडर, अब्दुल मेहबूब मोहमद खलील चौधरी आणि धर्मेंद्र हरीराम अग्रहरी यांनाही अटक केली. (प्रतिनिधी)