शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील १५ गावे, ३४ वाड्या टंचाईग्रस्त

By admin | Updated: March 16, 2017 03:12 IST

पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती

मयूर तांबडे, पनवेलपंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १५ गावे तर३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.मार्च महिना उजाडून १५ दिवस उलटले आहेत त्यामुळे उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे काही प्रमाणात सद्यस्थितीत पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये १५ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी मार्च महिन्यापासूनच पायपीट करावी लागत आहेत. ३१ मार्चअखेर इतकी बिकट अवस्था असेल, तर त्यापुढील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. टंचाई कृती आराखड्यात संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीने टंचाईग्रस्त गावांची उपाययोजनांसाठी वर्गवारी करण्यात आली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ८ गावे आणि १४ वाड्यांचा अशा २२ गाव-वाड्यांचा कृती आराखडा पाठविण्यात आला आहे. या कृती आराखड्यानुसार गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे व एक खासगी विहीर करण्यात येणार आहे. २०१७ च्या उन्हाळ्यात पनवेल तालुक्यातील १५ गावे, ३४ वाड्या असे एकूण ५२ नवीन विंधण विहिरी घेण्यासाठी २६ लाख व पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी एकूण पाच टँकर व खासगी बोअरवेल (वीजपंप) लागणार असून त्यासाठी २३ लाख असा एकूण ४९ लाख इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.मार्च अखेरपर्यंत तालुक्यातील काही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे असे येथील प्रशासनाचे मत आहे. असा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात शासकीय यंत्रणेकडून पाणी पुरवठा होऊ शकेल, परंतु त्यासाठी लागणारे पाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारे टँकर उपलब्ध होणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा पनवेल पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये ८ गावे, त्याखालील १४ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.