शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.सदस्यांना जादा निधी मिळणार

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

उत्पन्नात वाढ : मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प नागपूर : उत्पन्नातील वाढ व अखर्चित निधीमुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक रकमेचा राहणार आहे. त्यामुळे सदस्यांना २०१५-१६ या वर्षात सेस फंडातून विकास कामासाठी जादा निधी मिळणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला ...


उत्पन्नात वाढ : मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प
नागपूर : उत्पन्नातील वाढ व अखर्चित निधीमुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक रकमेचा राहणार आहे. त्यामुळे सदस्यांना २०१५-१६ या वर्षात सेस फंडातून विकास कामासाठी जादा निधी मिळणार आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी विविध विभागाकडून वित्त विभागाने नियोजन मागितले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक निधी मिळणार असल्याने जाणकार सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामे सुचविली आहेत.
३५ ते ३८ कोटींच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यात रखडलेले रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीची कामे विचारात घेता बांधकाम विभागाला झुकते माप मिळण्याची अपेक्षा आहे. अध्यक्ष निशा सावरकर यांच्याकडे असलेल्या लघु सिंचन विभागासाठी मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी जादा निधी मिळण्याची शक्यता आहे. यातून पाझर तलाव, उपसा जलसिंचन, योजना मार्गी लागण्याला मदत होईल.
गेल्या वर्षी जि.प. इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी ३८ लाख , सभागृह व समिती कक्षासाठी २३ लाख, सरपंचभवन बांधकामासाठी १५ लाख, अस्थायी निवासस्थाने दुरुस्तीसाठी ३५ अशी १.११ कोटीची तरतूद करण्यात आली होती. यावेळी या खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे सरपंच भवन परिसरातील जि.प.च्या जागेवर लॉन निर्माण करण्यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती वित्त समितीच्या सदस्यांनी दिली.
जि.प.च्या नवीन इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी तरतूद केली जाणार आहे. शाळांना संगणक उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, खेळाचे साहित्य पुरविणे यासाठी तरतूद केली जाणार आहे.(प्रतिनिधी)
चौकट....
समाजकल्याणसाठी सर्वाधिक तरतूद
अर्थसंकल्पाच्या २० टक्के निधी समाजकल्याण विभागाला दिला जातो. त्यामुळे या विभागाला सर्वाधिक निधी मिळणार आहे. अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वित्त विभाग कामाला लागला आहे. सभापती उकेश चव्हाण अर्थसंकल्प मांडणार आहे.