शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

युवराज हा सिंह, तो अंमली पदार्थ घेत नाही

By admin | Updated: November 3, 2016 17:09 IST

युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्माने युवीबाबत खळबळजनक वक्तव्य करत त्याला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते असं म्हटलं होतं.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू युवराज सिंग अंमली पदार्थांचे सेवन करायचा हे आरोप युवीचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी फेटाळले आहेत. युवराजच्या भावाची पत्नी आकांक्षा शर्माने युवीबाबत खळबळजनक वक्तव्य करत त्याला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन होते असं म्हटलं होतं. 
डेक्कन क्रोनिकलसोबत बोलताना योगराज म्हणाले, युवराजवर लावलेले आरोप म्हणजे मुर्खपणाची बडबड आहे. आरोप करणा-या महिलेने स्वतःचे घर सांभाळावे, तिच्या आरोपांमुळे युवराजच्या भारतीय संघामध्ये पुनरागमान करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही असंही योगराज म्हणाले. युवराज सिंग हा सिंह आहे तो अंमली पदार्थाचे सेवन करत नाही असं म्हणत त्यांनी आकांक्षा शर्माचे आरोप फेटाळले. 
आकांक्षा ही युवराजचा भाऊ झोरावर सिंगची पत्नी होती नुकतेच ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर ती बिग बॉस या कलर्स टीव्हीच्या शोमध्ये दिसली होती. या शोमधून बाहेर पडल्यावर झालेल्या एका इंटरव्यूमध्ये तिने एका पार्टीतून रात्री उशीरा घरी परतल्यावर मी, युवराज आणि झोरावरसोबत गांजा प्यायली होती असं म्हणाली होती. 
त्यावर बोलताना योगराज म्हणाले, मी 4 मुलांचा बाप आहे, केवळ युवराजच नाही माझा कोणताच मुलगा असले काही व्यसन करत नाहीत ते सिंहासारखे जगतात.