शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘तुझी बहीण तर पळून गेली…’,  पती-पत्नी सारखे मारायचे टोमणे, संतापलेल्या शेजाऱ्याने उचललं भयंकर पाऊल, केली दोघांचीही हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:16 IST

Crime News: शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने या दोघांचीही हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांना वैतागलेल्या एका तरुणाने मित्राच्या मदतीने या दोघांचीही हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यात घडली आहे. आरोपीची बहीण परजातीमधील तरुणासोबत पळून गेल्यावरून हे दाम्पत्य सारखे टोमणे मारायचे. त्याला वैतागून शेजारी राहणाऱ्या या तरुणाने एका नातेवाईकासोबत मिळून या दाम्पत्याची हत्या केली. तसेच त्यांच्या घरातील ऐवजाची लूट केली. या घटनेचा तातडीने तपास करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून चोरलेले दागदागिने आणि दोन कट्टे जप्त केले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फुलापूर गावातील महेश चंद्र आणि त्यांची पत्नी अनिता देवी या दाम्पत्याची २६ जानेवारी रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तसेच आरोपींनी घरात लुटालूट केल्याचंही दिसून आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिलं होतं. तसेच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तयार केली आणि आनंद आणि अर्जुन नावाच्या २ आरोपींना अटक केली. यापैकी आनंद हा मृत दाम्पत्याचा शेजारी तर अर्जुन हा त्यांचा चुलत जावई होता.

पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आनंद याची बहीण परजातीमधील एका तरुणासोबत पळून गेली होती. त्यावरून शेजारी राहणारं हे दाम्पत्य ‘तुझी बहीण तर पळून गेली’, असे म्हणून सारखे टोमणे मारायचे. त्यामुळे आनंद हा वैतागलेला होता.  त्याच रागातूनन आनंद याने मृत दाम्पत्याचा चुलत जावई असलेल्या अर्जुन याच्या मदतीने या दोघांचीही हत्या केली.

मृत दाम्पत्याच्या घरी १८ फेब्रुवारीला मुलाचा लग्नसोहळा होता. त्यामुळे घरात दागदागिने असतील, याचा अंदाज बांधून आरोपींनी घरात लुटालूटही केली. खरंतर आरोपींना केवळ महेश चंद्र यांचीच हत्या करायची होती. मात्र गोळी झाडत असतानाच त्यांची पत्नी तिथे आल्याने आरोपींनी तिचीही हत्या केली. त्यानंतर आरोपी घरातील दागदागिने घेऊन पसार झाले. मात्र यादरम्यान, आरोपींची टॉर्च घटनास्थळी राहिली. या टॉर्चवरूनच पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.    

English
हिंदी सारांश
Web Title : Taunts led to double murder; neighbor arrested in Uttar Pradesh.

Web Summary : Fed up with constant taunts, a neighbor in Uttar Pradesh murdered a couple with his relative. The taunts stemmed from the neighbor's sister eloping. Both suspects are arrested; stolen jewelry recovered.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश