शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी तरुण-तरुणीने खोलीची मागणी केली होती उमवि अत्याचार प्रकरण : हॉटेल शालिमारच्या वेटरची साक्ष

By admin | Updated: March 18, 2016 00:14 IST

जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्याचार प्रकरणात गुरुवारी न्या.एस. के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हॉटेल शालिमारचा वेटर बबनराव संतोष लोखंडे याची साक्ष नोंदविण्यात आली. ३ ऑगस्ट २०१४ रोजी विदेशी मुलगी व मुलगा हे एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा विदेशींनी एका खोलीची मागणी केल्याचे सांगितले, दरम्यान, लोखंडे याने दोन्ही आरोपींना न्यायालयात ओळखले.

जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्याचार प्रकरणात गुरुवारी न्या.एस. के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हॉटेल शालिमारचा वेटर बबनराव संतोष लोखंडे याची साक्ष नोंदविण्यात आली. ३ ऑगस्ट २०१४ रोजी विदेशी मुलगी व मुलगा हे एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा विदेशींनी एका खोलीची मागणी केल्याचे सांगितले, दरम्यान, लोखंडे याने दोन्ही आरोपींना न्यायालयात ओळखले.
हॉटेलमध्ये दोघं विदेशी तरुण-तरुणींसह आपल्याकडील २ ते ४ जण नेहमीच जेवायला यायचे. विदेशी इंग्रजीत तर आपल्याकडील मुले मराठीत बोलायचे. ३ ऑगस्ट २०१४ रोजी दोघं विदेशी एका मुलीला घेऊन आले. जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना मीच सर्व्हीस दिली.यावेळी विदेशी तरुणीने दारुची मागणी केली होती, परंतु मी दारू दिली नाही. कारण महाराष्ट्रीयन मुलीने त्यास विरोध केला होता. जेवण झाल्यानंतर बाहेर जात असताना महाराष्ट्रीयन मुलीला ते विदेशी आहेत, त्यांच्यासोबत तू राहू नकोस असे सांगितले होते.नंतर ते रिक्षाने निघून गेले. यावेळी दोन्ही आरोपींना त्यांनी ओळखले. आरोपीचे वकील अकील इस्माईल यांनी लोखंडी याची उलटतपासणी घेतली. संशयितांनी एकांतासाठी हॉटेलमध्ये खोली मागितली होती का? असे विचारले असता त्याने होकार दिला. ग्राहकांना दिल्या जाणार्‍या बिलात वेटरचे नाव असते, हे त्याने नाकारले. सरकारतर्फे ॲड.गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले.२३ मार्च रोजी पुढील कामकाज होणार आहे.