एसटी कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडवू कामगार मेळावा : विजयकुमार देशमुख यांची ग्वाही

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30

सोलापूर:

Workers' meet to solve the problems of ST employees: Vijay Kumar Deshmukh's allegation | एसटी कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडवू कामगार मेळावा : विजयकुमार देशमुख यांची ग्वाही

एसटी कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडवू कामगार मेळावा : विजयकुमार देशमुख यांची ग्वाही

लापूर:
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्‍यांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली़
येथील बसवंती मंगल कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कामगार मेळावा व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते़ सेवानिवृत्तीनिमित्त संघटनेचे नेते प्रकाश आगरकर यांचा देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी सरचिटणीस हनुमंत ताटे,सातार्‍याचे शिवाजी देशमुख, सांगलीचे विलास यादव, कोल्हापूरचे उत्तम पाटील, नाशिकचे प्रमोद भालेराव, उस्मानाबादचे शरद राऊत, मोहन कणसे,सुनील साळवी,बापू शिंदे, तानाजी सावंत आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते़
हनुमंत ताटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कामगार संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन देशमुख यांना दिले़ कामगारांच्या हित रक्षणासाठी आपण सदैव संघटनेच्या सोबत असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली़ प्रकाश आगरकर यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्व उल्लेख करत त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या़
एसटी कामगार संघटनेने आपल्याला पुत्रवत प्रेम दिले आहे़ संघटना आणि कुटुंब आपण कधीच वेगळे मानले नाही़ अशा शब्दात प्रकाश आगरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़
या मेळाव्यात जिल्‘ासह राज्यातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

Web Title: Workers' meet to solve the problems of ST employees: Vijay Kumar Deshmukh's allegation