शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 1:54 PM

हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यावरच सुरु होईल असे सरकारमधील काही उच्च सूत्रांनी सांगितल्याचे द इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत नमूद केले आहे.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि ख्रिसमसच्या आसपास संपते. एका वृत्तसंस्थेने यापुर्वी यावर्षीचे हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असू शकते आणि त्याच्या तारखा संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतरच समजतील असे वृत्त प्रसिद्ध केले होते. संसदेतील बहुतांश सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असतील त्यामुळे सरकारने अधिवेशन पुढे ढकलावे अशी प्रतिक्रीया एका वरिष्ठ मंत्र्यांने मिंट वर्तमानपत्राकडे व्यक्त केली होती. संसदेतील भाजपा आणि कॉंग्रेसचे सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असताना केवळ तिसऱ्या आघाडीचेच लोक संसदेत शिल्लक राहतील त्यामुळे बहुतांश सद्सय अनुपस्थित असताना चर्चा करणे अवघड होईल असे या मंत्र्यांने मिंटशी बोलताना सांगितले होते.

गुजरात-हिमाचल प्रदेशात कोण बाजी मारणार?

 हिमाचल प्रदेशात भाजपाचा भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत असला तरी गुजरातेत मात्र पक्षाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विजयरथ अखंडित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये निवडणूक दौरे ज्या वेगाने चालवले आहेत, त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना सुखाने झोपही येईनाशी झाली आहे. गुजरातच्या आधी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. पण राहुल गांधी व काँग्रेसने सारी शक्ती गुजरातमध्ये लावली असून, हिमाचल प्रदेशला मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या खांद्यावर सोपवले आहे. हिमाचल प्रदेश आपल्या हातातून निसटत चालल्याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाली आहे. त्यामुळे चांगली शक्यता असलेल्या गुजरातेत अधिक प्रयत्न करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेसने गुजरात जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणांच्या आधारे धोरणे आखली. गुजरातेत ४० टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून, मागासवर्ग ७५ जागांवर प्रभाव टाकू शकतो, हे पाहून राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचा नेता अल्पेश ठाकूर याला काँग्रेसमध्ये आणले. काँग्रेसचे दुसरे लक्ष्य होते पाटीदार (पटेल) समाज. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा सुरू आहे.