शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मी अपयशी ठरलोय ना, मग माझ्याविरोधात महाआघाडी का करता?- मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:23 IST

विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवर मोदींची घणाघाती टीका

तिरुपूर: विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा निशाणा साधला. मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असं म्हणता, मग माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज का भासते, असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. ते तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेससह, द्रमुकवर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुकवर टीका न करता दक्षिणेत मित्र जोडण्याचा पर्याय खुला ठेवला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील मोदींचा तामिळनाडू दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मोदींनी जनसभा घेतलेल्या तिरुपूरमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण मोठं आहे. मोदींच्या दौऱ्याचा, त्यांच्या सभेचा फायदा भाजपाला तिरुपूरसह आसपासच्या भागात होऊ शकतो. मोदींच्या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी उपस्थित होते. यावेळी दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यानंतर हे दोन्ही नेते कोईम्बतूर विमानतळावरही भेटले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपा आणि अण्णाद्रमुकमध्ये आघाडी होण्याची शक्यता वाढली आहे. तिरुपूरमधील सभेत मोदींनी विरोधकांच्या एकीवर घणाघाती हल्ला केला. पंतप्रधान अपयशी ठरले, असं विरोधक म्हणतात. मग त्यांना महाआघाडी करण्याची गरज का वाटते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. घराणेशाही पुढे नेण्यासाठीच महाआघाडी केली जात आहे. त्यांचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता यशस्वी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. राफेल डीलवरुन वारंवार लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी कडाडून टीका केली. संरक्षण क्षेत्रात काँग्रेसनं अनेक घोटाळे केले. मात्र भाजपानं भ्रष्टाचारमुक्त कारभार केला. संरक्षण क्षेत्राचा वापर काँग्रेसनं कायम त्यांच्या निकटवर्तीयांना कंत्राटं देण्यासाठी केला. जमिनीपासून आकाशापर्यंत त्यांनी भ्रष्टाचार केले. काँग्रेसच्या याच भ्रष्टाचारी वृत्तीचा परिणाम देशाच्या संरक्षण सिद्धतेवर झाला. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला खीळ बसली, असा आरोप मोदींनी केला. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९