शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

'देशावर 600 वर्ष राज्य करणाऱ्या मुस्लिमांना कशाची भीती वाटतेय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 11:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांचा सवाल

नवी दिल्ली: देशावर 600 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या मुस्लिम समाजाला आता कशाची भीती वाटतेय, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांनी उपस्थित केला आहे. देशातील सर्व धमांमध्ये समन्वय असायला हवा, असं म्हणत कोणाला भीती वाटत असल्यास त्यांनी चर्चा करायला हवी, असा सल्लादेखील गोपाळ यांनी दिला. मुघल बादशाह शाहजहानचा पुत्र दारा शिकोहवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील काही धर्मीयांची संख्या अवघ्या काही लाखांच्या घरात आहे. तर मुस्लिमांची संख्या 16-17 कोटी इतकी आहे. मात्र तरीही मुस्लिम समाजात का भयभीत झाला आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणाच्या मनात भीतीची भावना असल्यास त्यांनी संवाद साधून ती दूर करावी, असं गोपाळ म्हणाले. 'पाकिस्तानी दु:खी राहावेत, असा विचारदेखील भारतीयांच्या मनात येणार नाही. कारण सर्वे भवन्तु सुखिनः अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे,' असं गोपाळ यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी एका लेखाचा संदर्भ देत काही आकडेवारी सांगितली. 'देशातील पारशी समाजाची संख्या 50 हजार आहे. तर जैनांची संख्या 45 लाख, बौद्धांची 80-90 लाख, यहुदींची 5 हजार आहे. मात्र या समाजांना भीती वाटत नाही. पारशी घाबरलेत, जैन भयभीत आहेत, असं तुम्ही कधी ऐकलंय का? मग तुम्ही 16-17 कोटी असूनही भयभीत का? तुम्ही कोणामुळे घाबरले आहात?' असे प्रश्न गोपाळ यांनी उपस्थित केले. ज्या समाजानं 600 वर्ष सत्ता गाजवली. त्या कोणाची भीती वाटते?, असा सवालदेखील त्यांनी विचारला. 

टॅग्स :Muslimमुस्लीमRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ