Why Gandhi family members want SPG protection ?, Amit Shah raised the question | गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, अमित शाहांनी उपस्थित केला सवाल
गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, अमित शाहांनी उपस्थित केला सवाल

नवी दिल्लीः संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या संसदीय दलाची बैठक झाली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह आणि अर्जुन राम मेघवालही उपस्थित होते. त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू झालं असून, काँग्रेस खासदारांनी मोठा गदारोळ केला. काँग्रेसनं एसपीजीच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, असा प्रतिप्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला. दुसरीकडे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींच्या घरी एक घटना घडली. तेव्हा राहुल गांधी घरी भेटण्यासाठी येणार होते. राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि सोनिया गांधींची प्रियंका गांधींच्या घरी पोहोचल्यानंतर कोणतीही चौकशी होत नसते, त्यादरम्यान काळ्या रंगातील एक सफारी गाडी प्रियंका गांधींच्या घरी घुसून गाडीतून काँग्रेसचा एक नेता उतरला आहे. राहुल गांधी येणार असतात, त्याच वेळी तो नेता गाडीतून उतरतो. या प्रकरणात तीन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. तसेच उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत, असंही अमित शाहांनी स्पष्ट केलेलं आहे.

सरकारनं गांधी कुटुंबीयांची सुरक्षा परत घेतलेली नाही. फक्त त्यात बदल केलेला आहे. जी संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींना मिळाली आहे, तीच त्यांना परत देण्यात आली आहे. कम्युनिस्ट पार्टीला राजकीय बदलावर  बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. केरळमध्ये भाजपा आणि आरएसएसच्या 120हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. हा फक्त राजकीय बदलच आहे. 

Web Title: Why Gandhi family members want SPG protection ?, Amit Shah raised the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.