शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाेकप्रतिनिधींना शैक्षणिक पात्रता का नाही? पंजाब-हरयाणा हायकोर्टाचा सवाल, पहिल्या राष्ट्रपतींच्या चिंतेकडे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 07:26 IST

Court News: आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी किमान पात्रता अनिवार्य न केल्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खेद व्यक्त केला होता. राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे झाली तरी याची अद्याप दखल  घेतली गेली नाही, अशी खंत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.  

- डॉ. खुशालचंद बाहेती  
चंडीगड - आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी किमान पात्रता अनिवार्य न केल्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी खेद व्यक्त केला होता. राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे झाली तरी याची अद्याप दखल  घेतली गेली नाही, अशी खंत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.   

हरिंदर धिंग्रा यांनी २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार नरबीर सिंग यांच्याविरोधात न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. सिंग यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची नसल्याचा आरोप केला होता. सिंग यांच्याकडे पदवी प्रमाणपत्र आहे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता त्यांच्या नियंत्रणात नाही, असे निरीक्षण नोंदवत प्राथमिक टप्प्यावर तक्रार फेटाळली होती. धिंग्रा यांनी हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली. न्यायमूर्ती महाबीर सिंग सिंधू यांनी जिल्हा न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेच्या निकषांबाबत हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आमदार, खासदारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता अनिवार्य नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. याची अद्याप दखल घेतलेली नाही. हे ‘सुशिक्षित नागरिकांसाठी डोळे उघडणारे आहे.’ 

काय म्हणाले होते पहिले राष्ट्रपती?
डॉ. राजेंद्र प्रसाद (संविधान सभेचे अध्यक्ष) यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यापूर्वी व्यक्त केलेल्या भावना…
- मला विधिमंडळाच्या सदस्यांसाठी किमान पात्रता निश्चित करणे आवडले असते.
- कायद्याची अंमलबजावणी  करणाऱ्यांसाठी आपण शैक्षणिक पात्रतेचा आग्रह धरतो. परंतु, कायदा बनवणाऱ्यांसाठी किमान शैक्षणिक पात्रता नसणे विसंगत आहे.
- आमदार, खासदार तसेच मंत्री होण्यासाठी आपल्या देशात एकमेव पात्रता म्हणजे त्यांचे निवडून येणे हीच आहे. 
- जोपर्यंत आपल्या विधिमंडळ सदस्यांसाठी पात्रतेचे निकष लागू केले जाणार नाहीत, तोपर्यंत आपली राज्यघटना सदोष राहणार आहे.