शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपचा नंबर फेसबुकवर शेअर!

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या गुप्ततेच्या धोरणाला सोडचिठ्ठी देत, युजर्सची माहिती फेसबुकशी शेअर करण्याचा निर्णय घेतला असून, व्हॉट्सअ‍ॅप तुमचा मोबाइल नंबरही व माहिती फेसबुकशी

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या गुप्ततेच्या धोरणाला सोडचिठ्ठी देत, युजर्सची माहिती फेसबुकशी शेअर करण्याचा निर्णय घेतला असून, व्हॉट्सअ‍ॅप तुमचा मोबाइल नंबरही व माहिती फेसबुकशी शेअर करेल. फेसबुकच्या जाहिराती व्हॉट्सअ‍ॅप युजर्सपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हे केले आहे. फेसबुक खासगी माहितीचा वापर जाहिरातीसाठी करते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर दिसू लागल्यास डोक्याचा ताप वाढेल. या जाहिराती फेसबुकवर असतील, त्याचा व्हॉट्सअ‍ॅप जाहिरातींशी काहीही संबंध नसेल, असा कंपनीचा दावा आहे. आमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, याचीही आम्ही चाचपणी करत आहोत, असेही व्हॉट्सअपने म्हटले आहे. मात्र, हे पाऊल उचलण्यापूर्वी जगभरातील हजारो कोटी युजर्सचा डेटा सुरक्षित राहील, हा विश्वास व्हॉट्सअ‍ॅपने देणे गरजेचे आहे.

या निर्णयामुळे फेसबुकला सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचे मोबाइल नंबर मिळू शकतील. याचाच अर्थ, मोबाइल क्र मांक व माहिती फेसबुकला उपलब्ध होतील.

व्हॉट्सअ‍ॅपच्या क्रमांक फेसबुकला शेअर करायचे नसेल तर...
व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट हा आॅप्शन निवडावा. त्या ‘शेअर माय इन्फो’समोरील ‘बरोबर’चे चिन्ह काढून टाकावे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या निर्णयामुळे युजर्सची खासगी माहिती उघड होत असल्याने त्याला विरोध होताना दिसत आहे. तसे होणे स्वाभाविकच आहे.

- 14.20कोटी फेसबुक युजर्स भारतात
- 69लाख युजर्स रोज फेसबुकवर
- 90%युजर्स मोबाइलवर फेसबुक वापरतात
-07कोटी व्हॉटस्अप युजर्स भारतात