शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीसाठी पैसे कुठून आणणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By बाळकृष्ण परब | Updated: November 24, 2020 11:49 IST

Corona vaccine News : कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

नवी दिल्ली - कोरोनाचा फैलाव आणि लसीकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर काल पुन्हा एकदा टीका केली होती. तसेच कोरोनाच्या लसीसाठी सरकार पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारला होता. दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रश्नाला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी सर्व सरकारी योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोविडवरील लसीसाठीचा निधी आणि वितरणाबाबतची माहिती मागितली होती.भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास राज्यातील जनतेला मोफत कोरोनाची लस देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे वादास तोंड फुटले होते. त्यानंतर इतर अनेक राज्यांनीही मोफत लस देण्याची घोषणा केली होती. मात्र आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील लस ही सर्वांसाठी मोफत असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.मात्र काँग्रेस या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक राहिली आहे. याच लशीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लशी संदर्भात चार प्रश्न विचारले होते. कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न...१. उपलब्ध होणाऱ्या करोना लशींमधून भारत सरकार कोणत्या लशीची निवड करणार? आणि का?२. सर्वात प्रथम कोरोनाची लस कुणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? आणि त्याच्या वितरणाची सरकारची योजना काय?३. लस मोफत उपलब्ध होईल यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिली होती. त्यानंतर कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लशी पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे चार सवाल उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार