शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कुठे आहे बेटी बचाव?; भरसभेत त्यानं पंतप्रधान मोदींना सवाल केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 22:40 IST

भाषण करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या दिशेनं भिरकावले कागद

थानेसर: पंतप्रधान नरेंद्र मोदीहरयाणात जनसभेला संबोधित करताना एका व्यक्तीनं जोरदार घोषणाबाजी केली. या व्यक्तीनं मोदींच्या 'बेटी बचाव, बेटी पढाव'च्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदींच्या दिशेनं काही कागदपत्रं भिरकावली. कुठे आहे बेटी बचाव, बेटी पढाव, असा सवाल विचारत जवळपास 5 मिनिटं त्या व्यक्तीनं आरडाओरडा केला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पंतप्रधानांसमोर आरडाओरडा करुन त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतलं. माध्यमांच्या प्रतिनिधींपासून काही अंतरावर हा प्रकार घडला. हा प्रकार पाहण्यासाठी सभेला उपस्थित असणारे अनेक जण उभे राहिले. यावेळी पंतप्रधान मोदींचं भाषण सुरूच होतं. या व्यक्तीनं मोदींच्या दिशेनं फेकलेल्या कागदपत्रांमधून त्याचं नाव अशोक कुमार असल्याची माहिती समोर आली. अशोक कुमार जगधरीतील गुलाब नगरचा रहिवासी आहे. अशोक कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या दिशेनं भिरकावलेल्या कागदपत्रांमधून यमुना नगरमधील एका शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची व्यथा मांडली आहे. संबंधित मुलीवर तिच्याच शाळेतील शिक्षकानं 26 ऑगस्टला लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मोदींच्या दिशेनं फेकण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. मात्र त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या पालकांनी या प्रकरणी तडजोड करण्यास नकार दिल्यावर मुलीला मारहाण करण्यात आली. याशिवाय तिला आणि तिच्या पालकांना जातीयवादी शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर पीडित कुटुंबानं पोलिसांकडे धाव घेतली. मात्र त्यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. याउलट पीडित कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHaryanaहरयाणा