थलापती विजयने सख्ख्या वडिलांना खेचलं होतं कोर्टात, आईविरोधात ठोकला होता दावा; घडवला राजकीय चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:20 IST2026-05-04T17:19:57+5:302026-05-04T17:20:14+5:30

Thalapathy Vijay: तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या पक्षाने विजयाचा मास्टर स्ट्रोक मारला आहे.

When a son sued his own parents The legal battle behind Thalapathy Vijay rise to political power | थलापती विजयने सख्ख्या वडिलांना खेचलं होतं कोर्टात, आईविरोधात ठोकला होता दावा; घडवला राजकीय चमत्कार

थलापती विजयने सख्ख्या वडिलांना खेचलं होतं कोर्टात, आईविरोधात ठोकला होता दावा; घडवला राजकीय चमत्कार

Thalapathy Vijay: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार जोसेफ विजय म्हणजेच चाहत्यांचा लाडका थलापती विजय याच्या तमिझागा वेत्री कझगम या पक्षाने राजकारणात धमाकेदार एन्ट्री केली आहे. वियजच्या पक्षाने २३४ पैकी १०१ जागांवर आघाडी मिळवली आहे. मात्र, या यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी विजयला कौटुंबिक कलहाचा आणि कायदेशीर संघर्षाचा मोठा सामना करावा लागला होता, ज्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगली आहे.

जेव्हा मुलानेच आई-वडिलांविरुद्ध दाखल केला खटला

काही काळापूर्वी विजय आणि त्याचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.ए. चंद्रशेखर यांच्यात राजकीय कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चंद्रशेखर यांनी विजयच्या संमतीशिवाय ऑल इंडिया थलापती विजय मक्कल इयक्कम नावाच्या राजकीय पक्षाची नोंदणी केली होती. या पक्षाचे अध्यक्षपद नातेवाईक पद्मनाभन यांच्याकडे, तर आई शोभा यांच्याकडे खजिनदारपद सोपवण्यात आले होते.

या गोष्टीचा विजयला इतका राग आला की, त्याने थेट आपल्या आई-वडिलांसह ११ जणांविरुद्ध कोर्टात धाव घेतली. माझ्या नावाचा वापर करून कोणीही राजकीय सभा किंवा गर्दी जमवू नये, अशी विनंती त्याने कोर्टाला केली होती. या वादामुळे वडील आणि मुलाच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली होती.

विजयच्या यशाने जुना वाद विरघळला

आज जेव्हा थलापती विजयचा पक्ष तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, तेव्हा त्याचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी जुना सर्व राग विसरून मुलाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. विजयच्या पक्षाचे यश पाहून चंद्रशेखर यांनी कुटुंबासोबत सेलिब्रेशन सुरु केलं आहे. त्यांनी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिलं आहे.

विजयचे वडील ख्रिश्चन तर आई हिंदू आहेत. त्याला विद्या नावाची एक बहीण होती, जिचा वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी मृत्यू झाला. आजही विजय तिच्या आठवणीत भावूक होतो. तर विजयला दोन मुले आहेत. मुलगा जेसन संजय हा चित्रपट दिग्दर्शनाचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी दिव्या साशा अजून शिक्षण घेत आहे. विजयचा विवाह संगीता सोर्नालिंगम यांच्याशी १९९९ मध्ये झाला होता. संगीता या विजयच्या कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम पाहायच्या. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Web Title : थलपति विजय ने माता-पिता पर मुकदमा किया, अब राजनीतिक जीत का जश्न!

Web Summary : थलपति विजय की राजनीतिक पार्टी ने तमिलनाडु में जोरदार शुरुआत की। उन्होंने पहले पार्टी पंजीकरण विवाद पर अपने माता-पिता पर मुकदमा किया था। पारिवारिक विवादों के बावजूद, उनके पिता अब विजय की राजनीतिक सफलता का जश्न मना रहे हैं और कांग्रेस को सरकार बनाने का निमंत्रण दिया है।

Web Title : Thalapathy Vijay Sued Parents, Now Celebrates Political Win.

Web Summary : Thalapathy Vijay's political party made a strong debut in Tamil Nadu. He previously sued his parents over a party registration dispute. Despite past family conflicts, his father now celebrates Vijay's political success and offered Congress an invitation to form a government.